कॉमनवेल्थची धूम उद्यापासून सुरू

October 2, 2010 10:33 AM0 commentsViews:

2 ऑक्टोबर

कॉमनवेल्थ स्पर्धेला आता फक्त 24 तास उरले आहेत. भारतातील आतापर्यंतची सगळ्यात मोठी स्पर्धा असलेली कॉमनवेल्थ स्पर्धा उद्यापासून नवी दिल्लीत सुरु होईल.

यंदा या स्पर्धेत 6700 ऍथलीट्स सहभागी होणार आहेत. आतापर्यंतचा हा एक रेकॉर्ड आहे. खेळाडूंशिवाय जवळ जवळ सहा हजार सपोर्ट स्टाफ आणि अधिकारी या खेळाडूंसोबत असणार आहेत.

डेंग्यू आणि सुरक्षेच्या कारणांमुळे आघाडीचे ऍथलीट या स्पर्धेपासून दूर राहत आहेत, अशा बातम्या गेला महिनाभर मीडियात येत होत्या. पण स्पर्धकांच्या रेकॉर्ड सहभागामुळे या चर्चेलाही पूर्णविराम मिळाला आहे.

close