गांधीजींचा उर्जा संदेश जपणारी उर्जा बाग

October 2, 2010 10:46 AM0 commentsViews: 114

2 ऑक्टोबर

खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश… पुण्यातील एका संशोधक इंजीनिअरने विज्ञान आणि सर्जनशिलता खेड्यासाठी वापरली… स्थानिक साधनांचा वापर करत चंद्रकांत पाठक यांनी शेतकर्‍यांसाठी साधी-सोपी उपकरणे बनवली… त्यांनी तयार केलेली आधुनिक उर्जा बाग स्वावलंबनाचा नमुना ठरली आहे.

पुण्यातील तळेगावमधील कान्हे गावाजवळ एक आधुनिक उर्जा बाग उभारली गेली आहे. या उर्जा बागेत उर्जेची निमिर्ती करणारी अनेक उपकरणे ठेवण्यात आलेली आहेत. पेशाने इंजीनियर असणारे पुण्यातील चंद्रकांत पाठक यांनी ही उर्जेची उपकरणे बनवली आहेत. आणि ही सारी खटपट, आहे शेतकर्‍यांच्या सुविधांसाठी…

शेतीसाठी पाण्याचा वापर करताना वीज हवीच. पण वीज नसताना काय करणार? म्हणून एका बैलावर चालणारा पंप पाठकांनी शोधून काढला. पंप सुरू असतानाच त्यावर तुम्ही बॅटरी चार्ज करू शकता. त्यातून घरातील दिवे तुम्ही पेटवू शकता. शेतकर्‍यांची दुसरी मोठी समस्या म्हणजे फवारणी. त्यासाठी वेळेवर मजूर मिळत नाही.

यावर त्यांनी सायकल फवारणी पंप शोधून काढला. शेतकरी महिलाही याचा वापर करू शकते. पाठकांनी शोधून काढलेल्या अनेक उपकरणांसाठी सायकल हवीच.सर्वात महत्वाचे म्हणजे ही उपकरणे सोपी आहेत. त्यामुळे घरच्या घरी ती बनवता येतात.

या संशोधनासाठी पाठक यांना नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन तसंच प्रतिष्ठेचा ऍश्डेन पुरस्कारही मिळाला. सध्या जगभर तापमानावाढीचा विषय गाजत आहे. त्यावर असे प्रयोग संजीवनी ठरतील असे, पाठक यांना वाटते.

close