मिरज शहर पोलिसांची निराधारांसाठीची दिवाळी

October 28, 2008 11:44 AM0 commentsViews: 7

28 ऑक्टोबर, सांगली – दिवाळीचा सण कुटुंबासोबत साजरा करण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. घरच्यांसोबत दिवाळी म्हणजे सर्वोच्च आनंदाचा क्षण. पण जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना घरही नाही आणि घरची माणसंही नाहीत. रस्त्यावरून फिरणारी वेडी, मनोरुग्ण आणि निराधार माणसं यांच्या जीवनात दीपावलीचा उजेड कधी पडतच नाही. मात्र सांगली जिल्ह्यातील मिरज पोलीस ठाण्यात गेल्या पाच वर्षांपासून अशा लोकांसाठी दिवाळी साजरी केली जात आहे. एरवी टीकेचं लक्ष्य असणा-या पोलिसांनी आपल्यातही माणूस असल्याचं दाखवून दिलं आहे. याबाबत मिरज पोलीस ठाण्याचे पोली स उपअधीक्षक दिपक देवराज म्हणाले, 'दिवाळी साजरी करण्यासाठी घर आणि घरची माणसं नाहीत. तरीही आपली काळजी घेणारं कुणी आहे. आपल्यासाठी दिवाळीची तयारी करणारं कुणी आहे, या जाणिवेनंच या माणसांच्या चेह-यावर आनंद दिसतो'. कायमच समाजाच्या टीकेचं धनी बनलेल्या पोलिसांनी आतला माणूस अजुनही जिवंत असल्याचं यातून सिद्ध केलंय तर या निराधारांनाही आपलं कुणीतरी आहे, या भावनेनं जगण्याचं बळ मिळतंय.

close