दत्ता मेघेंचे उपोषणापासून घूमजाव

October 2, 2010 11:32 AM0 commentsViews: 2

2 ऑक्टोबर

स्वतंत्र विदर्भाबाबत उपोषण करण्याच्या भूमिकेपासून खासदार दत्ता मेघे यांनी माघार घेतली आहे. 23 मार्च रोजी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी मेघे यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली होती. याच दिवशी विदर्भव्यापी संप पुकारण्यात आला होता.

यानिमित्ताने मेघे यांनी मोठ्या उत्साहात उपोषणाची घोषणा केली होती. मात्र मेघेंनी आता यापासून त्यांनी माघार घेतली आहे. आणि त्यासाठी कारण पुढे केले आहे, हायकमांडचे.

याचवेळी दत्ता मेघे यांच्या या निर्णयावर विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांनी जबर टीका केली आहे. मेघे सर्वच गोष्टी हाय कमांडला विचारुन करतात काय ? असा सवाल धोटेंनी केला आहे.

close