ठाण्यातील शवागार बंद

October 2, 2010 12:25 PM0 commentsViews: 7

2 ऑक्टोबर

ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलमधिल शवगृह गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि बेवारस मृतदेहांची हेळसांड होत आहे.

ठाणे जिल्ह्यातील या एकमेव सरकारी हॉस्पिटलमध्ये दररोज जवळजवळ 20 मृतदेह शवविच्छेदनासाठी येतात. त्यात बेवारस मृतदेहांची संख्याही मोठी असते.

मात्र शितशवगृहाचा स्लॅब कोसळल्याने गेल्या 15 दिवसांपासून संपूर्ण यंत्रणाच कोलमडली आहे. सध्या मृतदेह महानगर पालिकेच्या कळवा हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येत आहेत.

कळव्याच्या हॉस्पिटलमध्ये 12 मृतदेह ठेवण्याचीच क्षमता असतानाही तिथे आता ठाणे सिव्हील हॉस्पिटलमधील मृतदेहही ठेवले जात आहेत. 15 दिवसानंतरही परिस्थिती जैसे थे अशीच आहे.

शवगृहाच्या दुरुस्तीसाठी निधी जिल्हापरिषदेकडून मिळाला तरी पीडब्ल्यूडीने अजूनही कामाला सुरूवात केलेली नाही.

close