ईद पार्टी प्रकरणी कारवाई करणार

October 2, 2010 12:35 PM0 commentsViews: 1

2 ऑक्टोबर

ईद पार्टीत आर. आर. पाटील यांच्यासोबत गुन्हेगारी जगताशी संबंध असलेला सलीम पटेल उर्फ सलीम गोवा गुटखा सहभागी झाल्याचे प्रकरण राष्ट्रवादीने आता गांभीर्याने घेतले आहे.

यातील दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. ते उस्मानाबादमध्ये बोलत होते.

तसेच कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत जोपर्यंत राष्ट्रवादीला मागणीप्रमाणे जास्त जागा मिळत नाहीत, तोपर्यंत काँग्रेसशी आघाडी करणाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

close