वसईतील गावे वगळण्याची सूचना 10 दिवसांत

October 2, 2010 12:51 PM0 commentsViews: 4

2 ऑक्टोबर

वसई महापालिका क्षेत्रातून गावे वगळण्याची अधिसूचना येत्या 10 दिवसांत जारी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी वसई जनआंदोलन समितीच्या विवेक पंडीत यांना दिले आहे.

याबाबतचा निर्णय होऊनदेखील राज्यसरकारकडून अंमलबजावणीसाठी टाळाटाळ केली जात होती. त्याच्या निषेधार्थ आज वसई ते मुख्यमंत्री निवास असा लाँग मार्च काढण्यात येणार होता.

पण हा मार्च वसईतच अडवण्यात आला. आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पंडीत यांना चर्चेसाठी आमंत्रित केले.

यावेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी 10 दिवसांत अधिसूचना काढण्याचे आमंत्रण दिले. त्यामुळे हा लाँगमार्च 15 दिवसांसाठी स्थगित करण्यात आल्याची घोषणा विवेक पंडीत यांनी केली.

या बैठकीला जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकही हजर होते.

close