‘मराठवाड्याच्या पाण्याआड काँग्रेसचाच नेता’

October 2, 2010 12:57 PM0 commentsViews: 7

2 ऑक्टोबर

कृष्णा खोर्‍याचे पाणी अजूनही मराठवाड्याला मिळालेले नाही, त्याला काँग्रेसचाच एक नेता खोडा घालत असल्याचे जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

या प्रकरणात आता मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीच हस्तक्षेप करावा, असा टोलाही पवारांनी हाणला आहे.

कृष्णा खोर्‍यातून मराठवाड्याला 21 टीएमसी पाणी मिळणार आहे. त्यासाठीची योजना इंदापूरमध्ये रखडली आहे. हर्षवर्धन पाटील यांचा त्याला विरोध असल्याचे बोलले जात आहे.

close