गांधी जयंतीनिमित्त तरुणाईकडून स्वच्छता

October 2, 2010 1:04 PM0 commentsViews: 8

2 ऑक्टोबर

मुंबईतल्या काही तरुणांनी गांधी जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी केली. बोरिवली नॅशनल पार्कमध्ये त्यांनी स्वच्छता मोहिम राबवली.

यात नॅच्युरा ऍडव्हेंचर्स, रिफ वॉच, रोट्रॅक्ट क्लबच्या 120 जणांचा सहभाग होता. त्यांनी फक्त दोन तासांत 833 किलो कचरा जमा केला.

या उपक्रमाला डान्स इंडिया डान्स फेम मयुरेशनेही हजेरी लावली होती.

close