ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या तिसर्‍या टेस्टमध्ये कुंबळेच्या कामगिरीविषयी उत्सुकता

October 28, 2008 11:52 AM0 commentsViews: 8

28 ऑक्टोबर, दिल्लीऑस्ट्रेलियाचा पराभव करून ही सीरिज जिंकण्याची सुवर्णसंधी. त्यातही फिरोजशहा कोटलाचं पिच म्हणजे फिरकी गोलंदाजांसाठी नंदनवन. या पिचवरची अनिल कुंबळेची दादागिरी त्याचे टीकाकारही अमान्य करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत भारतीय संघाला विजय मिळवून देण्याचं आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर चार वर्षांनी भारताचं नाव कोरण्याची अप्रतिम संधी अनिल कुंबळेकडे आहे. सहाजिकच या टेस्टमध्ये सगळ्यांचच लक्ष असेल ते अनिल कुंबळेच्या कामगिरीकडे.अर्थात याची जाणीव क्युरेटर राधे श्याम यांनाही आहे. 73 वर्षांचे राधे श्याम गेली काही दशकं फिरोजशाह कोटलाचं पिच तयार करत आहेत. कदाचित त्यांनी तयार केलेलं ही शेवटची पिच. त्यामुळेच दिल्लीत होणारी ही मॅच त्यांना अविस्मरणीय करायचीआहे. या पिचवर सर्वात यशस्वी ठरलेल्या अनिल कुंबळेला मदत होईल असं पिच त्यांना तयार करायचं आहे.कुंबळेही कदाचित या मैदानावरची आपली शेवटची मॅच खेळणार आहे. त्याच्यासाठीही हे मैदान सर्वात लकी ठरलं आहे. कुंबळेनं इथे खेळलेल्या 6 टेस्टमध्ये तब्बल 55 विकेट्स घेतल्या आहेत. म्हणजे दर 15 रन्स मागे 1 विकेट. पाकिस्तान विरूद्धची एका डावातील 10 विकेटची कामगिरीही त्याने याच मैदानावर केली आहे. त्यामुळे कुंबळेला त्याच्या समिक्षकांची तोंडं बंद करायला याच्यापेक्षा चांगली जागा मिळूच शकत नाही.दुखापतीतून सावरलेला कुंबळे या टेस्टमध्ये नक्की खेळणार त्यामुळे आता भारतासमोर एक कठीण प्रश्न उभा राहिला आहे.टीम व्यवस्थापनाला पदार्पणातच चांगली कामगिरी करणार्‍या अमित मिश्राला बाहेर ठेवावं लागेल किंवा तीन स्पिन बॉलर्सना घेऊन खेळावं लागेल… भारतानं 5 बॉलर्स घेऊन खेळायचं ठरवलं तर आणखीन एक मोठा निर्णय घ्यावा लागणार… मोहाली टेस्टमध्ये बॅट्समननी चांगली कामगिरी केल्यामुळे आता कोणाला वगळायचं हा प्रश्न आहेच.अनिल कुंबळेला कोणत्याही परिस्थितीत वगळण्याचा विचार नसल्याचं संघ व्यवस्थापनानं स्पष्ट केलं आहे. त्यासाठी पदार्पणातच 7 विकेट घेणार्‍या अमीत मिश्रालाही डच्चू द्यायची त्यांची परिस्थिती आहे. सहाजिकच चांगल्या कामगिरीचं अनिल कुंबळेवर दडपण असेल. पण चाहत्यांच्या अपेक्षांचं दडपण कुंबळेसाठी नवीन नाही. या टेस्टमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी करावी हीच त्याच्या चहात्यांची अपेक्षा असणार आहे.

close