गांधीजयंतीनिमित्त जळगावात चित्रकला स्पर्धा

October 2, 2010 1:16 PM0 commentsViews: 4

2 ऑक्टोबर

जळगावमध्ये गांधी जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गांधी रिसर्च फाऊंडेशनने आयोजित केलेल्या या स्पर्धेत जवळपास 1200 विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

विश्वबंधुता, राष्ट्रीय एकात्मता आणि गांधी विचार यावर आधारीत ही चित्रकला स्पर्धा होती. शहरातील महात्मा गांधी उद्यानात ही स्पर्धा झाली. त्यात जळगाव तालुक्यातील 26 शाळांतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.

विजेत्यांना रोख बक्षिसासह गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने गांधी विचार स्कॉलरशीप देण्यात येणार असल्याचेफाऊंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.

close