भारताची विजयी सलामी

October 4, 2010 9:03 AM0 commentsViews: 1

4 सप्टेंबर

कॉमनवेल्थ गेम्सला आज सकाळपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी भारताने विजयी सुरुवात केली आहे.

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतासाठी पहिला विजय मिळवुन दिला भारताच्या महिला टेबल टेनिस टीमने…

टीम इव्हेंटमध्ये भारताच्या शालिनी कुमारेसन, माओमा दास आणि पालोमी घटक यांनी पात्रता फेरीत श्रीलंकन टीमला 3-0 ने हरवले आहे.

तिघींनी आपल्या मॅच सरळ सेटमध्ये जिंकल्या. टेबल टेनिसच्या टीम इव्हेंटमध्ये पाचपैकी तीन मॅच जिंकणारी टीम विजयी होते. त्यामुळे भारतीय टीमने दुसरी राऊंड गाठला आहे.

टेनिसमध्ये रोहन बोप्पाना आणि रश्मी चक्रवर्ती दुसर्‍या राऊंडमध्ये

टेनिसमध्येही भारतीय टीमसाठी सुरुवात चांगली झाली आहे. रोहन बोपान्ना आणि महिलांमध्ये रश्मी चक्रवर्ती यांनी दुसर्‍या राऊंडमध्ये धडक मारली.

रोहन बोपन्नाने पुरुषांच्या सिंगल्समध्ये युगांडाच्या रॉबर्टबुयींझाचा सहज पराभव केला. पहिला सेट बोपन्नाने अगदी आरामात 6-1 ने जिंकला.

दुसर्‍या सेटमध्ये रॉबर्टने थोडीफार लढत दिली. एक मॅच पॉइंटही वाचवला. पण हा सेटही बोपान्नाने 6-4 ने जिंकला आणि मॅच खिशात घातली.

महिला गटात रुश्मी चक्रवर्तीला तर मॅच जिंकण्यासाठी जेमतेम अर्धा तास लागला. लिसिथो देशाच्या पिंकी माँटलाचा तिने 6-0, 6-1 ने फडशा पाडला.

close