ओली पार्टी करणारे निलंबित

October 4, 2010 10:06 AM0 commentsViews:

4 ऑक्टोबर

गांधी जयंतीच्या दिवशी सरकारी ऑफिसात ओली पार्टी करणार्‍या कर्मचार्‍यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. हे वर्धा कृषी विभागाचे पाच कर्मचारी आहेत.

विभागीय कृषी सह संचालकांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले ओहत. वर्धा जिल्ह्यात दारुबंदी लागू आहे.

गांधी जयंतीची सुट्टी असल्याने कर्मचार्‍यांनी ही पार्टी ठेवली होती.

ही खबर मिळताच पोलिसांनी ऑफिसवर धाड टाकली. मात्र कर्मचारी पळून जाण्यात यशस्वी झाले होते.

close