बँक ग्राहकांना लुटणारी टोळी पकडली

October 4, 2010 10:15 AM0 commentsViews:

4 ऑक्टोबर

महाराष्ट्रासह इतर राज्यांत बँक ग्राहकांना लुटणार्‍या दरोडेखोरांच्या टोळीला पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. या टोळीत 9 तरुण आहेत.

या तरूणांजवळून पोलिसांनी घातक शस्त्रे जप्त केली आहेत. हे सगळे तरूण गुजरातमधील अहमदाबादचे रहिवासी आहेत.

गेल्या दोन महिन्यांत पुणे जिल्ह्यात या टोळीने लुटमार केल्याच्या 25 घटना उघडकीस आल्या आहेत.

कुणासोबत असा प्रकार झाला असेल तर त्यांनी त्वरित पुणे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

close