कलमाडींची प्रेक्षकांकडून हुर्यो

October 4, 2010 10:18 AM0 commentsViews: 4

4 ऑक्टोबर

कॉमनवेल्थ गेम्सचा उद्घाटन सोहळा काल दिमाखात पार पडला. पण आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्यासाठी कालची संध्याकाळ फारशी चांगली नव्हती.

एरवी सोहळ्यातील कार्यक्रमांना मनापासून दाद देणार्‍या प्रेक्षकांनी कलमाडी भाषणासाठी उठल्यावर त्यांची जोरदार हुर्यो उडवली.

संपूर्ण भाषणभर कलमाडींना प्रेक्षकांचा रोष पत्करावा लागला. कलमाडींनी मात्र भाषणात आयोजनातील त्रुटी झाकण्याचा प्रयत्न केला.

शिवाय प्रेक्षकांनी केलेल्या हुर्योबाबत आपण एकलेही नाही, अशी प्रतिक्रिया आज व्यक्त केली.

आपल्याला ही स्पर्धा यशस्वी करायचीय. आणि त्यावरच आपले सध्या लक्ष आहे, असेही ते म्हणाले.

close