मणिशंकर यांना चिंता फटाक्यांच्या पैशांची

October 4, 2010 10:23 AM0 commentsViews: 1

4 ऑक्टोबर

कॉमनवेल्थ गेम्सचं उद्घाटन दणक्यात झाले असले, तरी त्याबद्दल आता वाद सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उद्घाटन सोहळ्यात उडवलेल्या फटाक्यांवर किती पैसा वाया गेला, असा सवाल काँग्रेसचे खासदार मणिशंकर अय्यर यांनी केला आहे.

या पैशांमध्ये किती खेड्यांमध्ये दवाखाने उघडले असते, इंदिरा आवास योजनेअंतर्गत किती गरीबांना घरे बांधून मिळाली असती, किती लहान मुलांचे लसीकरण झाले असते, तसेच किती गावांमध्ये शौचालये बांधली गेली असती, असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.

close