सूर्याची पिल्ले हाऊस फुल

October 4, 2010 10:43 AM0 commentsViews: 3

माधुरी निकुंभ, मुंबई

4 ऑक्टोबर

सुबक निर्मित हर्बेरियम या उपक्रमाअंतर्गत सूर्याची पिल्ले या नाटकाचे 25 हाऊस फुल प्रयोग झाले. तर रौप्य महोत्सवी प्रयोगालाही हाऊस फुल प्रतिसाद मिळाला आहे.

सूर्याची पिल्ले या नाटकामुळे प्रतिमा कुलकर्णी पहिल्यांदाच एका कॉमेडी बाजाच्या नाटकाचे दिग्दर्शन करताना दिसल्या. 2 अंकी नाटकांचा ट्रेंड असूनसुद्धा हे 3 अंकी नाटक प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले.

षण्मुखानंद हॉलमध्ये अडीच तीन हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत या नाटकाचा 25वा प्रयोग पार पडला.

एका गाजलेल्या नाटकाचा याचि देही याची डोळा अनुभव प्रेक्षकांना या 25प्रयोगांमुळे मिळाला.

या 25व्या प्रयोगाला सिनेमा-नाटक आणि राजकीय वर्तुळातील अनेक मंडळी उपस्थित होती.

25 प्रयोगांमध्येही बर्‍याच प्रेक्षकांना हे नाटक पहायला मिळाले नाही.

त्यांच्यासाठी पुन्हा या नाटकाचे काही प्रयोग व्हावेत, अशी काही प्रेक्षकांची मागणी आहे.

आता सगळ्याच प्रेक्षकांना वेध लागलेत ते सुबक हर्बेरियमच्या पुढच्या पुष्पाचे…

close