बस कर्मचार्‍यांचे औरंगाबाद पालिकेसमोर उपोषण

October 4, 2010 10:50 AM0 commentsViews: 6

4 ऑक्टोबर

औरंगाबाद म्युनिसिपल ट्रान्सपोर्टच्या सर्व म्हणजे 394 कर्मचार्‍यांनी महानगरपालिकेसमोर सहकुटुंब उपोषणास सुरुवात केली आहे.

गेल्या चार महिन्यांपासून पगारच नसल्याने कर्मचार्‍यांनी चक्का जाम आंदोलन सुरू केले. औरंगाबादमध्ये सलग आठव्या दिवशी शहर बस वाहतूक बंद आहे.

महानगरपालिका आणि अकोला प्रवासी वाहतूक संघटनेच्या वादामुळे आज शहर बस सेवा बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

शहरात 72 बसेस पैकी 55 बसेस सस्त्यावर धावत होत्या. पण आठ दिवसांपासून शहर बस सेवा बंद पडली आहे.

बस सेवेच्या कर्मचार्‍यांना महानगरपालिकेने सेवेत सामावून घेण्याची शाश्वती दिली नाही.

तर कंत्राटदारानेसुध्दा या कर्मचार्‍यांना वार्‍यावर सोडले आहे. त्यामुळे या कर्मचार्‍यांच्या कुटुंबाची उपासमार सुरू झाली आहे.

close