मानसिक आजारावर मात करणार्‍यांचा गौरव

October 4, 2010 10:58 AM0 commentsViews: 10

उदय जाधव, मुंबई

4 ऑक्टोबर

मानसिक आजारांवर मात करत पुन्हा नव्याने आयुष्य जगणार्‍या व्यक्तींचा, ठाण्यात द्विज पुरस्काराने गौरव करण्यात आला.

शारिरीक आजारापेक्षा मानसीक आजारावर मात करणे कठीण असते. त्यासाठी मोठ्या आत्मविश्वासाासेबतच जिद्दही लागते.

अशा आजारावर मात करणार्‍या पाच व्यक्तींचा, ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये हा द्विज पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी मानसिक रूग्णांना बळ देण्यासाठी समाजाने पुढे येण्याची गरज मान्यवरांनी व्यक्त केली.

या वेळी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर, जेष्ठ लेखक अनिल अवचट, 'आयबीएन-लोकमत'चे संपादक निखिल वागळे उपस्थित प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आनंद नाडकर्णी यांच्या इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ या संस्थेतर्फे, हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

मानसीक आजारातून बरे होणार्‍या व्यक्तींना अशा प्रकारे गौरवणारी, आयपीएच ही जगातील दुसरी संस्था आहे.

मानसीक रूग्णांना समाजाने पाठबळ दिल्यास त्यांना पुन्हा सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता येईल.

close