पेण अर्बन बँकेवर निर्बंध

October 4, 2010 11:16 AM0 commentsViews: 22

4 ऑक्टोबर

रायगड जिल्ह्यातील पेण अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणले आहेत.

बँकेच्या या परिस्थितीला राज्याचे अर्थमंत्री सुनील तटकरे जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस नेते रवींद्र पाटील यांनी केला आहे.

तर रवींद्र पाटील यांचीच मनस्थिती ठिक नसल्याचा टोला तटकरे यांनी लगावला आहे.

पेण को-ऑपरेटिव्ह बँक ही रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी सहकारी बँक म्हणून ओळखली जाते.

मात्र कर्जवितरण आणि कर्जवसुली यात ताळमेळ ठेवला नसल्याने रिझर्व्ह बँकेने या बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध घातले आहेत.

close