मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी अटक केलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांचे भाजप उच्चपदस्थांशी संबंध

October 28, 2008 12:20 PM0 commentsViews: 14

28 ऑक्टोबर, नाशिकमालेगाव बॉम्बस्फोटात अटक झालेल्या साध्वी प्रज्ञा सिंग हिचे भाजप परिवाराशी संबंध होते, याची आणखी माहिती पुढे येत आहे. साध्वी प्रज्ञा सिंग इंदौरच्या स्वामी अवधेशानंद गिरी महाराज यांची शिष्या होती. या स्वामींनी एक यज्ञ केला होता. चंड कोटी नावाच्या या यज्ञाला मध्यप्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान हजर होते. मुख्यमंत्री चौहान यांच्या ठीक मागच्या बाजूला साध्वी प्रज्ञा सिंग बसल्याचं आयबीएन लोकमतला मिळालेल्या फूटेजवरून स्पष्ट झालं आहे. साध्वी प्रज्ञा सिंग हिचा वावर कुठल्या वर्तुळात होता हेच या दृश्यावरुन उघड होत आहे.दरम्यान या घटनेवर प्रतिक्रिया देण्यास मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नकार दिला आहे. या माहितीचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून सुरू झाला आहे. साध्वी प्रज्ञा सिंग या गेल्या अनेक वर्षांपासून अभाविप या विद्यार्थी संघटनेशी संबंधीत आहे. भाजपातील अनेक हाय प्रोफाईल नेत्यांशी त्याची जवळीक आहे. या मुद्याचं तात्काळ स्पषटीकरण देण्याची तसेच आरएसएस आणि बजरंग दलावर बंदी घालण्याची मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे.

close