भारतासमोर 216 रन्सचे आव्हान

October 4, 2010 12:28 PM0 commentsViews:

4 ऑक्टोबर

मोहाली टेस्ट आता रंगतदार अवस्थेत पोहचली आहे. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 216 रन्सचे टार्गेट ठेवले आहे.

याला उत्तर देताना भारताची सुरुवात खराब झाली.

ओपनिंगला आलेला गौतम गंभीर शून्यावर आऊट झाला. मॅचच्या पहिल्याच ओव्हरमध्ये हिल्फेनहॉसने त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले.

तर राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग आणि सुरेश रैनाही झटपट आऊट झाले. हिल्फेनहॉसने तीन विकेट घेतल्या.

भारताच्या चार विकेट अवघ्या 48 रन्समध्ये गेल्या.त्याआधी पहिल्या इनिंगमध्ये 23 रन्सची आघाडी घेऊन खेळणार्‍या ऑस्ट्रेलियाची दुसरी इनिंग 192 रन्सवर ऑलआऊट झाली.

close