वेट लिफ्टर सोनियाला सिल्व्हर

October 4, 2010 12:46 PM0 commentsViews:

4 ऑक्टोबर

कॉमनवेल्थमध्ये भारताचे मेडलचे खाते पहिल्याच दिवशी उघडले गेले.

वेटलिफ्टींगमध्ये 48 किलो वजनी गटात सोनिया चानुने सिल्व्हर मेडल पटकावले आहे.

तिने 167 किलो वजन उचलले. तर याच गटात संध्या राणीने ब्राँझ मेडल पटकावले. तिने 165 किलो वजन उचलले.

सायना आणि चेतनने सिंगल्स जिंकल्या

बॅडमिंटनमध्ये अपेक्षेप्रमाणे टीम इव्हेंटमध्ये भारताची सुरुवात चांगली झाली आहे.

सायना नेहवाल आणि चेतन आनंद यांनी केनियाविरुद्ध आपल्या सिंगल्सच्या मॅच जिंकल्या आहेत.

सायनाने मर्सी जोसेफचा 21-11, 21-17ने पराभव केला.

त्यापूर्वी मिक्स्ड टीम इव्हेंटच्या पहिल्या मॅचमध्ये चेतन आनंदने केनियाच्या व्हिक्टर मुंगाचा दोन सरळ सेटमध्ये पराभव केला.

चेतनने ही मॅच 21-7, आणि 21-13 अशी अर्ध्या तासात जिंकली.

पुरुषांच्या डबल्समध्येही सॅनवे थॉमस आणि रुपेश कुमार यांनी विजय मिळवला.

close