भिवंडीजवळ 4 पाईपलाईन फुटल्या

October 4, 2010 2:35 PM0 commentsViews: 3

4 ऑक्टोबर

नाशिक मुंबई महामार्गावर भिवंडीजवळच्या पिंपळास गाव इथे ठाणे महापालिकेच्या चार पाइपलाईन फुटल्या आहेत. यातून मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरू आहे.

भिवंडी, ठाणे आणि मीरा भाईंदर या शहरांना पाणी पुरवठा करणार्‍या या लाईन आहेत.

यामुळे घोडबंदर रोड, मीरा रोड आणि ठाणे ग्रामीण भागात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पण या पाणीगळतीकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.

close