300 विकेटसाठी हरभजनला हवी फक्त एक विकेट

October 28, 2008 12:26 PM0 commentsViews: 4

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये हरभजन सिंगची कामगिरी विशेष उल्लेखनीय झाली आहे. मोहाली टेस्टच्या दुस-या इनिंगमध्ये त्याच्या जादूई स्पीनसमोर ऑस्ट्रेलियाची टॉप ऑर्डर अक्षरश: कोसळली. दुस-या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियानं आक्रमक सुरुवात केली. पण कॅप्टन धोणीने हरभजनच्या हातात बॉल सोपवला आणि त्याने एकाच ओव्हरमध्ये दोघांच्या विकेट्स मिळवल्या. आधी त्याने हेडनला 29 रन्सवर एल बी डब्ल्यू केलं. नंतर सचिनने कॅटिचचा एक अप्रतिम कॅच पकडला. हरभजननेच नंतर माईक हसीचा अडसर दूर केला. त्यानं 15 ओव्हरमध्ये फक्त 23 रन्स देत तीन विकेट घेतल्या. टेस्ट करियरमध्ये हरभजनला 300 विकेट्सचा टप्पा पार करायला आता फक्त एका विकेटची गरज आहे. मोहाली टेस्ट धरून हरभजन आत्तापर्यंत 71 टेस्ट मॅचेस खेळलाय. त्यात त्यानं 9247 रन्स देत 299 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा अ‍ॅव्हरेज आहे 31.17 इतका. 84 रन्स देत 8 विकेट ही करिअरमधली त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

close