‘दामदुप्पट’वाल्यांकडून पुण्यात फसवणूक

October 4, 2010 2:47 PM0 commentsViews: 1

4 ऑक्टोबर

'एक वर्षात पैसे दामदुप्पट' या योजनेखाली लाखो रूपये जमा करून शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे प्रकरण पुण्यात उघड झाले आहे.

कर्वेनगर भागात मधुरा ग्रुप या कंपनीतर्फे गुंतवणुकदारांकडून पैसे गोळा केले जात होते. गेले काही दिवस पैसे मिळणे बंद झाल्याने गुंतवणूकदारांना संशय आला.

तथापी कंपनीतर्फे काळजी करू नका, तक्रार करू नका, पैसे परत मिळतील, असे आश्वासन देण्यात येत होते. पण आता ऑफीस बंद करून मालक गायब झाल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.

या ऑफीसमधे काम करणारे ब्रँच मॅनेजर तसेच ऑफीस बॉय यांचाही पगार गेले 4 महिने दिला गेलेला नाही. आता या प्रकरणी पोलिसात आर्थिक फसवणुकीची तक्रार देण्यात आली आहे.

close