औरंगाबादमध्ये जोरदार पाऊस

October 4, 2010 10:46 AM0 commentsViews:

4 ऑक्टोबर

औरंगाबाद शहरात आज जोरदार पाऊस झाला. शहरात अनेक ठिकाणी वीजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. जोरदार पावसाने काही ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत झाला.

औरंगाबादसह ग्रामीण भागातही जोरात पाऊस झाला. पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर शहरातील सखल भागांत अनेक घरांमध्ये पाणी साचले.

अनेक नाल्यांना पूर आल्याने नाल्याकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

close