आंतरराष्ट्रीय मिडियाला भावला उदघाटन सोहळा

October 4, 2010 4:56 PM0 commentsViews: 5

4 ऑक्टोबर

रविवारी संध्याकाळी कॉमनवेल्थचा उद्घाटन नेत्रदीपक सोहळा धडाक्यात झाला. या सोहळ्यानंतर इतके दिवस कॉमनवेल्थच्या आयोजनावर टीका करणारी आंतरराष्ट्रीय मीडिया भारताचे कौतुक करू लागली आहे. या सोहळ्याची तुलना त्यांनी बीजिंग ऑलिम्पिकशी केली आहे.

पण परदेशी मीडियाने कॉमवेल्थबद्दल दाखवलेली सर्व भीती खोटी ठरली. रविवारच्या उद्घाटनाच्या दिमाखदार सोहळ्याने सगळ्यांच्या शंका दूर झाल्या.

उद्घाटनाच्या या भव्य सोहळ्यामुळे आंतरराष्ट्रीय मीडियाचे डोळे दिपून गेले. यापूर्वी झालेल्या समारंभांपेक्षा हा सोहळा भव्य असल्याचे आंतरराष्ट्रीय मीडियाने मान्य केले आहे.

चीननेदेखील आलिम्पिकचे उद्घाटन अतिशय भव्य केले होते. मीडियाने भारताची तुलना त्याच्याशी केली आहे.ऑस्ट्रेलियाचा हेराल्ड सन, ऑस्ट्रेलिया म्हणते, 'उद्घाटन समारंभाचा भारताला अभिमान वाटायला हवा.

यात झगमगाट तर होताच, पण त्यात बीजिंगपेक्षा जास्त आपुलकी होती.' इंग्लडच्या द गार्डियनने म्हटले आहे, 'भारताचे दमदार आगमन'. द टोरोंटो स्टारने म्हटले आहे, 'वाईट आठवणी विसरायला लावणारा शानदार सोहळा'.

'रेल्वेचं सुंदर दृश्य', '7 वर्षांचा ग्रेट तबलावादक' आदी अनेक गोष्टी परदेशी मीडियाला भावल्या आहेत. त्यामुळे उद्घाटन सोहळ्याने सध्या तरी टीकाकारांची तोंडे बंद केल्याचे चित्र आहे.

close