ढसाळांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन

October 4, 2010 5:18 PM0 commentsViews: 3

4 ऑक्टोबर

दिल्लीत एकीकडे कॉमनवेल्थ गेम्सची धूम सुरू असताना दुसरीकडे साहित्यिक आणि सांस्कृतिक घडामोडींनाही उधाण आले आहे. आज ज्येष्ठ साहित्यिक नामदेव ढसाळ यांच्या हस्ते कॉमनवेल्थ लेखकांच्या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.

एके काळी ब्रिटीश साम्राज्याचा भाग असलेल्या 71 देशांमधील लेखकांनी यात सहभाग घेतला आहे.

या संमेलनाचे आयोजन साहित्य अकादमीने केले आहे. तसेच कॉमनवेल्थ देशांमधील पुस्तकांचे प्रदर्शनसुद्धा भरवण्यात आले आहे.

पुढचे 12 दिवस 71 देशांमधून आलेल्या विविध कलाकारांची नृत्ये, नाटकांची मेजवानीही रसिकांना मिळणार आहे. यात वस्त्रहरण हे मराठी नाटकही दाखवले जाणार आहे.

close