नक्षलवाद्यांनी पोलिसांची व्हॅन उडवली

October 5, 2010 8:08 AM0 commentsViews: 1

5 ऑक्टोबर

गडचिरोलीत नक्षलवांद्यानी पोलिसांची सी-60 व्हॅन स्फोटकांनी उडवली आहे. टेरमिलीपासून हे स्थळ 30 ते 35 किलोमीटर अंतरावर आहे.

तलवाडा जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरु आहे. मृतांचा आणि जखमींचा आकडा कळू शकलेला नाही. सीआरपीएफ आणि पोलिसाचे संयुक्त ऑपरेशन सुरु असतानाच ही घटना घडली. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणावर पोलीस ताफा पाठवण्यात आला आहे.

शहिदांना मानवंदना

कालच परमिलीच्या जंगलात नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांची गाडी उडवली. त्यात 4 पोलीस शहीद झाले. पीआय निवृत्ती यादव, जवान आनंद गाजगणे, पीएसआय शशिकांत मोरे, पीएसआय महेंद्रकुमार नालकुले, अशी त्यांची नावे आहेत.

या शहिदांना गडचिरोली पोलीस मुख्यालयात मानवंदना देण्यात आली. पीआय महेंद्रकुमार नारकुल यांचा मृतदेह मात्र मिळालेला नाही.

close