मोहालीत शानदार विजय…

October 5, 2010 8:30 AM0 commentsViews: 1

5 ऑक्टोबर

मोहाली टेस्टमध्ये भारताने शानदार विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाचा 1 विकेटने पराभव करत भारताने दोन टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

भारताच्या विजयाचे हिरो ठरले ते व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण आणि ईशांत शर्मा. नवव्या विकेटसाठी या दोघांनी दमदार पार्टनरशिप करत भारताला विजय मिळवून दिला. विजयासाठी 216 रन्सचे टार्गेट समोर ठेवून खेळणार्‍या भारताची सुरुवात खराब झाली.

भारताची टॉप ऑर्डर कोसळली. सचिन तेंडुलकरही 38 रन्स करुन आऊट झाला. तर कॅप्टन महेंद्रसिंग धोणी आणि हरभजन सिंगही झटपट पॅव्हेलियनमध्ये परतले. व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने सावध बॅटिंग करत मैदानावर तळ ठोकला.

लक्ष्मणने नॉटआऊट 73 रन्स करत भारताला विजय मिळवून दिला. त्याला ईशांत शर्मानेही चांगली साथ दिली. ईशांत शर्मा 31 रन्सवर आऊट झाला.

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानची दुसरी टेस्ट येत्या 9 ऑक्टोबरपासून बंगलोरमध्ये खेळवली जाईल.

close