पुण्यात पावसाचे दोन बळी

October 5, 2010 9:04 AM0 commentsViews: 2

5 ऑक्टोबर

पुण्यात काल रात्रभर मुसळधार पाऊस झाला. यामध्ये दोघांचा बळी गेला आहे. शहरात जागोजागी पाणी साचले आहे.

पाषाण येथील सूस रस्त्यावर एनसीएलची कम्पाऊंड वॉल मजुरांवर कोसळली. या दुर्घटनेत दोन मजूर ठार झाले. तर एक जण जखमी झाला.

प्रचंड पावसामुळे शहरातील रस्त्यांना नाल्यांचे स्वरूप आले होते. रात्री आठ वाजता पाऊस सुरू झाला. दहा वाजेपर्यंत जवळपास 25 हून जास्त ठिकाणी पाणी घुसल्याच्या तक्रारी फायर ब्रिगेडकडे नोंदवण्यात आल्या होत्या.

शहरात जागोजागी साचलेल्या पाण्याने झालेल्या दुरवस्थेच्या विरोधात शिवसेनेने आंदोलन सुरू केले आहे. कोथरुड भागातील कर्वे पुतळा चौकात शिवसैनिकांनी आंदोलन केले.

close