विदर्भात वीजेचे 27 बळी

October 5, 2010 9:11 AM0 commentsViews: 1

5 ऑक्टोबर

मराठवाड्यात पाठोपाठ विदर्भातही विजेने थैमान घातले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे वीज कोसळून झालेल्या विविध घटनांमध्ये गेल्या 24 तासात 27 जण ठार झालेत, तर 30 जण जखमी झाले आहेत.

मराठवाड्यात रात्री वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये 13 जण ठार, तर 22 जण जखमी झाले आहेत. विदर्भातील घटनांमध्ये मृतांमध्ये यवतमाळ 6, अमरावतीत 3, बुलडाण्यात 3, भंडारा 1, नागपूर , अकोला आणि वाशिम जिल्हात प्रत्येकी चार जणांचा समावेश आहे.

अनेक जनावरेही ठार झाली असून मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यात तीन ठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

भंडारा जिल्ह्यात पावसात पळसाच्या झाडाचा आश्रय घेतलेल्या कैलास थेर यांच्यावर वीज कोसळली. मृतांमध्ये बुहतांश शेतकरी आणि शेतमजूर आहेत.

close