फटाकेमुक्त दिवाळी अभियान सुरू

October 5, 2010 9:36 AM0 commentsViews: 9

5 ऑक्टोबर

फटाकेमुक्त दिवाळी हे अभियान संपूर्ण राज्यभरात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येणार आहे.

या राज्यव्यापी अभियानाची सुरूवात शालेय शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात आणि नरेंद्र दाभोळकर यांच्या उपस्थितीत संगमनेरमधून करण्यात आली.

राज्यात दरवर्षी जवळपास 400 कोटींचे फटाके दिवाळीत वाजवले जातात. यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण तसेच वायू प्रदूषणही होते.

फटाके वाजवण्यात बच्चे कंपनीचा मोठा सहभाग असतो. म्हणूनच या अभियानात मुलांना सामील करुन घेण्यात आले आहे.

close