रजनीकांत मातोश्रीवर…

October 5, 2010 10:57 AM0 commentsViews: 9

5 ऑक्टोबर

दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांतने आज मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. यावेली रजनीकांतने बाळासाहेबांसोबत जेवणही घेतले.

या निमित्ताने उध्दव ठाकरे यांनी रजनीकांतला महाराष्ट्र देशा हे पुस्तक भेट दिले. रोबो हीट झाल्यानंतर रजनीकांतची ही पहिलीच मुंबई भेट आहे.

रोबोने बॉक्स ऑफिसवरचे सर्व विक्रम मोडल्याने रजनीची जादू पुन्हा एका बघायला मिळाली आहे. आपल्याला मराठी सिनेमामध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे यावेळी रजनीकांतने सांगितले.

close