दुर्मिळ जातीच्या कासवाची सुटका

October 5, 2010 2:19 PM0 commentsViews: 7

5 ऑक्टोबर

पुण्यातील तळेगाव परिसरात दुमिर्ळ जातीच्या कासवाची तस्करी रोखण्यात एका सर्पमित्र संघटनेला यश आले आहे.

इंडियन सॉफ्टसेल टर्टल प्रजातीचे हे कासव आहे. या प्रजातीतील सगळ्यात मोठे, वजनदार आणि वयस्कर असे हे कासव आहे.

109 वर्षांच्या ह्या कासवाची लांबी 70 सेंटीमीटर तर वजन तब्बल 25 किलो आहे. अंधश्रद्देपोटी एक कोटीच्या देवाण-घेवाणीतून या कासवाची तस्करी होणार होती.

परंतू सर्पमित्र किशोर मोकाशे यांनी हे कासव विकणार्‍यांकडून या कासवाला ताब्यात घेतले. आणिवनअधिकार्‍यांच्या स्वाधीन केले.

close