आघाडी जुन्याच फॉर्म्युल्यावर

October 6, 2010 10:24 AM0 commentsViews: 5

6 ऑक्टाबर

अखेर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत काँग्रेस – राष्ट्रवादीत जुन्याच फॉर्म्युल्यावर आघाडी झाली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष मधुकररराव पिचड यांनीही त्याला दुजोरा दिला आहे.

त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस 55 तर राष्ट्रवादी 52 जागा लढवणार हे निश्चित झाल्याचे समजते. थोड्याच वेळात याची अधिकृत घोषणा होणार आहे.

सुरुवातीलाही हाच फॉर्म्युला ठरवण्यात आला होता. पण अजित पवारांनी या फॉर्मुल्यावर आक्षेप घेतला होता. तर नारायण राणे जुन्याच फॉर्म्युल्यावर अडले होते. त्यामुळे आघाडी बिनसण्याची शक्यता निर्माण झाली होती.

close