गुलजारांचं ‘लकिरे’ रंगमंचावर येतंय

October 28, 2008 12:31 PM0 commentsViews: 6

28 ऑक्टोबर, मुंबई – गुलजार यांच्या कथांवर आणि कवितांवर आजपर्यंत अनेक चित्रपट, गाणी तयार झाली आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी लिहिलेल्या कथा आणि कवितांवर 'लकिरे' नावाचं एक नवं नाटक हिंदी रंगभूमीवर येत आहे. त्यात लुब्ना सलीम, किशोर कदम आणि यशपाल यादव हे कलाकार आहेत. या नाटकाचं दिग्दर्शन सलीम अरिफ यांनी केलं आहे. गुलजार साहेबांच्या आयुष्यातील काही घटनांवर 'लकिरे' या नाटकातील कथा बेतल्या आहेत. भारत- पाक सीमा आणि त्यामुळे विभागल्या गेलेल्या लोकांचा अनुभव 'लकिरे'मध्ये आहे. कथा, नाट्य आणि मध्येच कविता, असा नाटकाचा प्रवास होत आहे. 'नाटकाचा प्रवास कथा, नाट्य आणि मध्येच कविता अशा अंगाने होत असल्यामुळे 'लकिरे' रंगभूमीवर कसं दिसेल, याची उत्सुकता आम्हा सर्वांनाच आहे', असं नाटकातील अभिनेत्री, निर्माती लुब्ना सलीम म्हणाली. नाट्य आणि कवितांना चाली बांधल्यामुळे नाट्य संगीताची छबी हिंदीतही दिसतेय, असं म्हणायला हरकत नाही.

close