मनसेने कसली कंबर

October 6, 2010 10:42 AM0 commentsViews: 4

6 ऑक्टोबर

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी मनसेने कंबर कसली आहे. यावेळी महापौर मनसेचा असेल, अशी घोषणाच राज ठाकरेंनी केली आहे. आणि आता ती प्रत्यक्षात आणण्यासाठी राज कामाला लागले आहेत.

राज ठाकरे डोंबिवलीत दाखल झालेत. राज ठाकरे उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. त्यासाठी ते डोंबिवलीत मुक्कामी आहेत.

मनसे 9 तारखेला अंतिम यादी, जाहीर करण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनं बैठकांना सुरुवात झाली आहे.राज ठाकरे ज्येष्ठ नागरिकांशी संवादही साधत आहेत.

close