शूटिंगमध्ये चौथे गोल्ड!

October 6, 2010 11:23 AM0 commentsViews: 5

6 ऑक्टाबर

शूटिंगमध्ये भारताची गोल्डन कामगिरी आजही सुरुच आहे. भारताच्या अनिसा सय्यदने शूटिंगमध्ये भारताला चौथे गोल्ड मेडल मिळवून दिले आहे. 25 मीटर पिस्टल प्रकारात अनिसाने 786.8 पॉईंटची कमाई केली.

गोल्ड मेडलबरोबरच तिने कॉमनवेल्थ गेम्समध्ये नव्या रेकॉर्डचीही नोंद केली. तर भारताच्या राही सरनौबतने सिल्व्हर मेडल पटकावले. राहिने 781 पॉईंट मिळवले.

पात्रता फेरीत राही तिसर्‍या क्रमांकावर होती. पण फायनलमध्ये तिने चांगली कामगिरी करत दुसर्‍या क्रमांकावर झेप घेतली. अनिसा आणि राहिने काल पेअरमध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून दिले होते. पण आज वैयक्तिक प्रकारात या दोघी आमने-सामने होत्या आणि यात अनिसाने बाजी मारली.

गगन नारंगला गोल्ड

शुटिंगमध्ये 10 मीटर एअर रायफल प्रकारात गगन नारंगला अपेक्षेप्रमाणेच गोल्ड मिळाले आहे. तर डबल ट्रॅफ प्रकारात भारताने सिल्व्हर मेडल जिंकले.

रंजन सोढी आणि अशर नोरिया या भारताच्या युवा जोडीने सिल्व्हर मेडल पटकावले. रंजन आणि अशरला एकूण 188 पॉईंट्स मिळाले. यात रंजनने 95 तर अशरने 93 चा स्कोअर केला.

इंग्लंडची जोडी या प्रकारात अव्वल ठरली. त्याअगोदर गगन नारंगने 10 मीटर एअर रायफल प्रकारात गोल्ड तर अभिनवने सिल्व्हर मेडल पटकावले. पात्रता फेरीत गगन नारंगने 600 पैकी 600 पॉईंट मिळवून नवा गेम्स रेकॉर्ड केल. आणि त्याचबरोबर स्वत:च्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरीसुद्धा केली.

कुस्तीपटूंची आगेकूच

कॉमनवेल्थमध्ये भारतीय कुस्तीपटूंची आगेकूच सुरुच आहे. कुस्तीत भारताची आणखी दोन मेडल पक्की झालीत. 84 किलो वजनी गटात मनोज कुमारने फायनलमध्ये धडक दिली आहे.

सेमी फायनलमध्ये डीन झील व्हॅन या दक्षिण आफ्रिकन कुस्तीपटूने मात्र मनोज कुमारला चांगलेच झुंजवले. पण पहिले दोनही डाव एका पॉईंटच्या फरकाने जिंकत मनोज कुमारने ही मॅच जिंकली. त्यापूर्वी 55 किलो वजनी गटातही राजेंदर कुमारने फायनल गाठली.

बॉक्सिंगमध्ये चांगली कामगिरी

बॉक्सिंगमध्येही भारतीय खेळाडूंची कामगिरी चांगली होत आहे. भारताच्या जय भगवानने दुसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. 60 किलो वजनी गटात भगवानने नैरुच्या कॅलेब कोलानचा 9-1 असा सहज पराभव केला.

close