संतोष सिंहला जन्मठेप

October 6, 2010 11:43 AM0 commentsViews: 5

6 ऑक्टोबर

प्रियदर्शनी मट्टू हत्या प्रकरणी, संतोष सिंहला सुप्रीम कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

या प्रकरणी संतोष सिंहला हायकोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती.

पण कोर्टाने त्याची शिक्षा कमी करत त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 1996 मध्ये प्रियदर्शनीची हत्या करण्यात आली होती.

संतोष सिंह कोण आहे…

दिल्ली युनिव्हर्सिटीचा कायद्याचा विद्यार्थी

एका माजी आयपीएस अधिकार्‍याचा मुलगा

संतोष प्रियदर्शनी मट्टूच्याच कॉलेजमध्ये शिकत होता

प्रियदर्शनीचा सतत मानसिक छळ करण्यात आल्याचा त्याच्यावर आरोप

या केसमध्ये 40 वर्षांचा संतोष 2006 पासून तिहार जेलमध्ये आहे

close