शूटिंगमध्ये पाचवे गोल्ड!

October 6, 2010 11:56 AM0 commentsViews:

6 ऑक्टोबर

भारताने आज शूटिंगमध्ये 5व्या गोल्ड मेडलची नोंद केली आहे. भारताच्या ओमकार सिंगने आज गोल्डन कामगिरी केली.

50 मीटर पिस्टल प्रकारात त्याने गोल्ड मेडलवर कब्जा केला. ओमकारने 653.6 पॉईंटची नोंद केली.

पात्रता फेरीत ओमकार दुसर्‍या स्थानावर होता.

पण फायनलमध्ये त्याने आपली कामगिरी उंचावली आणि गोल्ड आपल्या नावावर केले.

भारताचा दिपक शर्मा मात्र फायनलमध्ये प्रवेश करु शकला नाही.

कॉमनवेल्थच्या तिसर्‍या दिवशी भारतीय खेळाडू शूटिंगच्या चार प्रकारात खेळले.

आणि यातील तब्बल तीन प्रकारात त्यांनी गोल्ड मेडलची कमाई केली.

तर आज भारतीय खेळाडूंनी 3 सिल्व्हर मेडलचीही कमाई केली आहे.

close