प्रिमियर लीगमध्ये लिव्हरपूलने चेल्सीचा 1-0 असा पराभव केला

October 28, 2008 12:42 PM0 commentsViews: 2

झॅबी अलान्सोने सुरुवातीलाच मारलेल्या गोलवर लिव्हरपूलने चेल्सीचा 1-0 असा पराभव केला. या विजयामुळे प्रिमियर लीगमध्ये लिव्हरपूलने प्रथम स्थान पटकावलं आहे. याचबरोबर चेल्सीची विजयी घोडदौडही त्यांनी रोखली. अलान्सोने मारलेला बॉल गोलकिपरला चुकवत गोलपोस्टमध्ये जाऊन आदळला. आणि हाच लिव्हरपूलचा मॅचमधला एकमेव विजयी गोल ठरला. चार वर्ष आणि आठ महिन्यांनंतर स्टॅण्डफोर्ड ब्रीजमधला चेल्सीचा हा पहिला पराभव आहे. चेल्सीने लागोपाठ 86 मॅचेस जिंकल्या होत्या.

close