नाशिकमधील कान्हेरे ग्राऊंड वादात

October 6, 2010 12:15 PM0 commentsViews: 5

6 ऑक्टोबर

नाशिकच्या मध्यवर्ती असणारे हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरचं क्रिकेट ग्राऊंड वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे.

सध्या हे ग्राऊंड नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ताब्यात आहे.

मात्र तो ताबा फक्त मेंटेनन्सचा असूनही संघटना त्याचा उपयोग व्यावसायिक वापरासाठी करत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेत्या हेमलता पाटील यांनी केला आहे.

मैदानावर सराव करणार्‍या खेळाडूंनी त्यांच्या नेतृत्वाखाली ग्राउंडचा ताबा घेतला आहे.

मात्र हे आरोप राजकीय हेतूने आणि गैरसमजुतीतून केल्याचे स्पष्टीकरण संघटनेने दिले आहे.

close