शहीद जवानांवर अंत्यसंस्कार

October 6, 2010 12:18 PM0 commentsViews: 2

6 ऑक्टोबर

गडचिरोलीत नक्षलवाद्यांना घडवून आलेल्या भूसुरुंग स्फोटात चार पोलीस जवान शहीद झाले आहेत.

सातार्‍यातील सावली गावाचे सुपुत्र शशिकांत मोरे यांनाही या घटनेत वीरमरण आले.

काल रात्री उशीरा त्यांचा मृतदेह सावली या त्यांच्या जन्मगावी आणण्यात आला.

त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोरे हे तीन वर्षापूर्वी नक्षलग्रस्त भागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले होते.

कार्यकाळ संपल्याने आज ते आपल्या गावी परत येणार होते. पण नक्षलवादी घातपातात त्यांचा मृत्यू झाला.

नालकुल यांना अखेरचा निरोप

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटात अहमदनगरच्या चिचोंडी पाटील येथील पोलीस उपनिरीक्षक महेंद्रकुमार उर्फ नरेश नालकुल शहीद झाले.

काल रात्री उशिरा त्यांचे पार्थिव चिचोंडी इथे आणण्यात आले. आज त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसस्कार करण्यात आले.

पोलिसांनी बंदुकीच्या 3 फैर्‍या झाडून त्यांना मानवंदना दिली.

close