औरंगाबादमध्ये रंगला भोंडला-भुलाबाई

October 6, 2010 12:23 PM0 commentsViews: 128

6 ऑक्टोबर

पारंपरिक गीतांबरोबर महिलांचा भोंडला उत्सव कसा रंगतदार असतो हे औरंगाबादच्या महिलांनी दाखवून दिले आहे.

ऐलमा पैलमा गणेशदेवा, शिवाजी आमुचा राणा, एक लिंबू झेलू बाई, अक्कन माती यांसारखी पारंपरिक गीते यावेळी सादर करण्यात आली.

बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी औरंगाबादच्या आस्था जनविकास संस्थेने हा भोंडला-भुलाबाई आयोजित केला होता.

यात महिलांसह लहान मुलींनी मोठा सहभाग गेतला.

close