जळगावात भूसंपादनात गैरव्यवहार

October 6, 2010 1:33 PM0 commentsViews:

प्रशांत बाग, जळगाव

6 ऑक्टोबर

भूसंपादनाच्या नावाखाली शेतकर्‍यांच्या जमिनींबाबत जळगावमध्ये गैरव्यवहार होत आहेत.

काही दलाल या गैरव्यवहारात शेतकर्‍यांना ओढत आहेत.

एरंडोल तालुक्यातील भालगाव लघु प्रकल्पासाठी 2003 साली संपादीत केलेल्या जमिनीबाबत असाच प्रकार घडला आहे.

येथील कासाबाई रामकिसन बिर्ला यांच्या संपादीत 2 हेक्टर 12 आर जमिनीचे सरकारी मूल्य आहे 42 हजार 836.

पण सरकारी अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने या जमिनीची नवीन किंमत आहे, 87 लाख 84 हजार 139. तसेच 2003 ला जमीन संपादित करताना या जमिनीवर एकही झाड नव्हते.

पण एका वर्षानंतर मात्र त्याच जमिनीवर चक्क 1 हजार 756 झाडे असल्याचा साक्षात्कार कृषी विभागाला झाला.

या प्रकरणाबद्दल आम्ही चौकशी केल्यावर जळगावच्याा भूसंपादन ऑफीस तातडीने कागदपत्रांची छाननी सुरु झाली.

कासाबाई रामकिसन बिर्लांसह 19 जणांची उर्वरीत 35 टक्के रक्कम थांबविण्याचे आदेशही दिले.

प्रकल्पासाठी सरकार जमीन घेणार हे समजताच पडेल भावाने येथील दलाल त्या विकत घेतात.

आणि संबंधित विभागातील अधिकार्‍यांशी संधान साधून आपली पोळी भाजतात.

शेतकर्‍यांना योग्य किंमत मिळत नाहीच आणि दलाल मात्र गब्बर होतात.

close