दिवाळी शुभेच्छांच्या वाढत्या एसएमएस मुळे मोबाईल कंपंन्यांची चांदी

October 28, 2008 12:56 PM0 commentsViews: 22

28 ऑक्टोबर, दिल्ली दिवाळीच्या दिवसांत 'नेटवर्क जाम'ची समस्या मोबाईल ग्राहकांच्या अंगवळणी पडली आहे. त्यामुळं यंदाच्या दिवाळीत ग्राहकांनी दिवाळीपूर्वीच एसएमएस पाठवायला सुरुवात केली आहे. 2006 मध्ये मोबाईल धारकांची संख्या साडे तेरा कोटी होती. तर 2007 मध्ये मोबाईल धारकांची संख्या 21 कोटी झाली. 2008 या चालू आर्थिक वर्षात ही संख्या 32 कोटी झाली. टेलिकॉम कंपन्यांच्या समोर वाढत्या मोबाईल धारकांची संख्या ही एक गंभीर समस्या बनली आहे.प्रत्येक सणांच्या दिवसांत कॉल ड्रॉपमध्ये 5 ते 6 टक्क्यांनी वाढ होते. नवीन वर्षांच्या सुरुवातीला त्यात 20 ते 25 टक्क्यांची वाढ होते. त्यामुळे सणांच्या दिवसांत एसएमएस करण्यासाठी जास्त पैसेही मोजावे लागतात. वर्षभरात दोनवेळा एसएमएसच्या दरात वाढ करण्याची मुभा ट्रायनं दिली आहे. त्याचा फायदा मोबाईल कंपन्या घेतात, पण पण तरीही ग्राहकांना अजूनही मोबाईल सेवेत कोणताही चांगला बदल जाणवलेला नाही.

close