रिलायन्स दरवाढीला स्थगिती

October 6, 2010 3:13 PM0 commentsViews: 1

6 ऑक्टोबर

रिलायन्सच्या दरवाढीला स्थगिती देण्याची सूचना राज्य सरकारने एमईआरसीला केली आहे. मंत्रिमंडळाची वीजविषयक उपसमिती याबाबत निर्णय घेणार आहे.

राज्य सरकारचा विशेषाधिकार वापरुन एमईआरसीला सरकरा ही सूचना करणार आहे. याला मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री आणि अर्थमंत्र्यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे.

भाजपचा मोर्चा

मुंबईत रिलायन्स एनर्जीच्या वीज दर वाढीच्या विरोधात आज भाजपने मोर्चा काढला. रिलायन्स एनर्जीच्या सांताक्रुझ येथील येथील मुख्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता.

कालच सत्ताधारी काँग्रेस पक्षाने देखील, वीजदर वाढीच्या विरोधात मोर्चा काढला होता. रिलायन्सने नुकतीच वीज दरवाढ केली आहे.

close