दसरा मेळाव्यासाठी शिवसेना हायकोर्टात

October 6, 2010 5:15 PM0 commentsViews: 2

6 ऑक्टोबर

शिवाजी पार्कवर होणार्‍या शिवसेनेच्या दसर्‍या मेळाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

पण आता शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी मिळण्यासाठी शिवसेनेने आज हायकोर्टात याचिका दाखल केली. कोर्टाने ही याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेवर आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

हायकोर्टाने शिवाजी पार्कचा भाग सायलेन्स झोन म्हणून जाहीर केल्यानंतर इथे दसरा मेळावा होणार की नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

close